SR 24 NEWS

इतर

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे वादळी वाऱ्यांसह गारांचा मारा.

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी मध्ये गावडेवाडी , वाघवाडी , चौधरवाडी , माळवाडी , कुटेवाडी , ठाकरवाडी , लमानतांडा , आणि ढवळपुरी परिसरामध्ये गारपीटमुळे गुरुवार (दि. १९) दुपारी ५:३० वाजता वादळी वाऱ्यासह ३० मिनिटे गारपीट, तर १ तास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेले कांदा, गहू, टॉमेटो, हरभरा, कलिंगड, झेंडू, वाटाणा व आंब्याला मोठा फटका बसला.

एकीकडे शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात गारपिटीमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.गारपीट व पावसामुळे शेतात काढून ठेवलेला माल भिजला. या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शेतात काढून ठेवलेला कांदा, गहू, हरभरा पिकाला गारपिटीचा फटका बसला. शेतीमालाला भाव नसताना दुसरीकडे गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून, भिजलेला शेतमाल ठेवता येणार नाही. तो विक्रीसाठी न्यावा लागणार असल्याचे कांदा उत्पादक वैभव सुधाकर गावडे यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!