तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यात जवळपास सर्वत्र अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने वरून राजाने हाता- तोंडाला आलेल्या पिकावर संक्रांत केल्याने अगोदर मेताकुठीला आलेला बळीराजा या आसमानी संकटाने उघडा पडल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्यासह अणदूर,नळदुर्ग, जळकोट, ईटकळ, शहापूर , काटगाव जवळपास संपूर्ण तालुक्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे पुन्हा कंबर्डे मोडल्याने दुहेरी संकटात सापडला आहे.
आज दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 4 .00 वाजल्यापासूनच सायंकाळी सहा वाजेपर्यंत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी गारांच्या पावसाने उभी पिकावर व काढून टाकून टाकलेल्या पिकावर दणका बसला आहे. या अवकाळी पावसात ज्वारी, गहू, हरभरा, द्राक्ष, आंबा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी उघडा पडला आहे.विजेचा अवेळी पुरवठा, बहुतेक साखर कारखान्याने उसाचे बिल शेतकऱ्यांना न दिल्याने बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. त्यात पुन्हा अवकाळीचा सामना शेतकऱ्यांना जीव घ्यावा ठरत आहे.. या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद घोडके यांनी केली आहे.
अवकाळीच्या दणक्याने तुळजापूर तालुक्यात – वादळी वाऱ्यासह गार पिटाने पिकांची मोठे नुकसान..!, बळीराजा अस्मानी संकटात

0Share
Leave a reply












