SR 24 NEWS

इतर

वांबोरी येथील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रकमधून २५९ लिटर डिझेलची चोरी, तिघा अज्ञातांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील कांतीलाल शांतीलाल अँड सन्स मुनोत भारत पेट्रोलियम पंपावर उभ्या असलेल्या एका ट्रकच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २५९ लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष निवृत्ती पागिरे (वय ५१, रा. वांबोरी, ता. राहुरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १९ मार्च २०२६ रोजी रात्री १२:४५ वाजेच्या सुमारास वांबोरी येथील मुनोत पेट्रोल पंपावर ट्रक (क्र. MH 42 B 8427) उभा होता. यावेळी तीन अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण व कुलूप तोडले. त्यानंतर टाकीतून अंदाजे २५९ लिटर डिझेल बेकायदेशीरपणे काढून चोरून नेले.

या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारे डिझेल चोरी झाल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!