SR 24 NEWS

इतर

टाकळीमिया येथून स्प्लेंडर दुचाकीची चोरी; राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरातून अज्ञात चोरट्याने एक महागडी दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित राहुल माळी (वय ३५, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) यांनी आपली स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटारसायकल (क्रमांक MH-16 AZ 8861) दि. १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:०० ते ६:३० वाजेदरम्यान टाकळीमिया येथील ‘झावरे पंचर’ दुकानासमोर उभी केली होती. याच वेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय सदर दुचाकी स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेली. या दुचाकीची किंमत अंदाजे २८,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर बराच शोध घेतला असता दुचाकीचा मागोवा लागला नाही. त्यामुळे अखेर दि. २१ मार्च रोजी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २५५/२०२५ प्रमाणे नोंदविला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एन. पी. सप्तर्षी करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!