मांजरी (प्रतिनिधी) : मांजरी येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ मातृसदस्य गं. भा. जनाबाई शहाजी विटनोर (वय ९२) यांचे दि. १८ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मांजरी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.स्वभावाने अत्यंत साध्या, कष्टाळू व संस्कारशील असलेल्या जनाबाई विटनोर यांनी आयुष्यभर कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. आदर्श माता म्हणून त्यांनी कुटुंबात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या पश्चात शिवाजी शहाजी पा. विटनोर, अण्णासाहेब शहाजी पा. विटनोर, विलास शहाजी पा. विटनोर, किशोर शहाजी पा. विटनोर अशी चार मुले, तसेच तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या यशवंत सेना जिल्हा संपर्क प्रमुख रंगनाथ अण्णा तमनर तसेच राजेंद्र महानोर व विजय महानोर यांच्या मावशी होत.त्यांच्या निधनाने विटनोर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून विविध सामाजिक, राजकीय व ग्रामस्थ स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
मांजरी येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील गं.भा.जनाबाई शहाजी विटनोर यांचे वृद्धापकाळाने निधन

0Share
Leave a reply













