SR 24 NEWS

राजकीय

प्रादेशिक पर्यटन विकास कामाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा ॲड. दीपक आलूरे यांची माहिती अणदूर

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे  : अणदूर येथील बसस्थानक ते खंडोबा मंदिर या मार्गावरील प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत पूर्ण झालेल्या महत्त्वपूर्ण विकास कामाचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. १ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यास ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तथा माजी सभापती ॲड. दीपक दादा आलूरे यांनी आज दि. २७ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार राणा दादा पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपाचे नेते सुजितसिंह ठाकूर, सुनील चव्हाण तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पासाठी एकूण १ कोटी ९९ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी १ कोटी ६६ लाख रुपयांतून अत्यंत आकर्षक, रुंद व दर्जेदार रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ३३ लाख रुपयांतून अयोध्येच्या धर्तीवर अत्याधुनिक पथदिव्यांची उभारणी करण्यात आली असून, त्यामुळे शहराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली असल्याचे ॲड. आलूरे यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष दीपक घोडके, माजी सरपंच धनराज मुळे, दयानंद मुडके, प्रवीण घोडके, लक्ष्मण बोंगरगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!