SR 24 NEWS

राजकीय

स्व.चंद्रकांत अण्णा धमुरे प्रतिष्ठानची थाप बळ देणारी – लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी /  चंद्रकांत हागलगुंडे : स्व. चंद्रकांत अण्णा धमुरे प्रतिष्ठानची यशस्वीतेसाठीची थाप ही माझ्या राजकीय कारकिर्दीला दिशा व प्रेरणा देणारी ठरली असून, आगामी काळात मिळालेल्या नगराध्यक्ष पदाचा उपयोग शहरवासीयांसाठी संधीचे सोने करण्यासाठी करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी दिली.येथील स्व. चंद्रकांत अण्णा धमुरे प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नागनाथ कुंभार होते. तर ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत अणदूरकर व राज्य शिखर बँकेचे व्यवस्थापक सिद्धेश्वर मुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने जय मल्हार पत्रकार संघाने नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचा शाल, फेटा व जंबो पुष्पहार घालून गौरवपूर्ण सत्कार केला.

यावेळी बोलताना धरणे म्हणाले की, दादा–मालकांचा राजकारणविरहित विकासाचा रथ, पत्रकार बांधवांचा विश्वास आणि जनतेची परिवर्तन शक्ती या त्रिवेणी संगमाच्या बळावर शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जीवाचे रान करणार आहे.प्रतिष्ठानच्या सामाजिक क्षेत्रातील योगदान अत्यंत भूषणावह असून, सत्कार्याला साथ देण्याची त्यांची प्रेरणा कौतुकास्पद व नव्या पिढीसाठी आदर्शवत असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात डॉ. नागनाथ कुंभार यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळात नळदुर्ग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांची कस लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष करबसाप्पा धमुरे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल गुड्ड यांनी केले तर आभारप्रदर्शन लक्ष्मण नरे यांनी मानले. या सन्मान सोहळ्यास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!