SR 24 NEWS

इतर

राहुरीत प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणारा आरोपी पोलिसांकडुन जेरबंद, नायलॉन मांजा विक्री किंवा साठवणूक करताना आढळल्यास तात्काळ राहुरी पोलीसांना संपर्क साधावा – पोलीस निरीक्षक संजय ठेंगे

Spread the love

राहुरीत प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

नायलॉन मांजा विक्री किंवा साठवणूक करताना आढळल्यास तात्काळ राहुरी पोलीसांना संपर्क साधावा – पोलीस निरीक्षक संजय ठेंगे

राहुरी | प्रतिनिधी

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कानिफनाथ चौक परिसरात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राहुरी पोलिसांनी शनिवारी (दि. २७ डिसेंबर २०१५) सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत सचिन शांताराम क्षीरसागर (वय ४३, रा. कानिफनाथ चौक, राहुरी) हा इसम शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची अनाधिकृत विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून सुमारे ७ हजार रुपये किमतीचे रंगीबेरंगी नायलॉन मांजाचे १४ बंडल जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, १२५ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, भाऊसाहेब शिरसाठ व अजिनाथ गिते यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कुणीही शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री किंवा साठवणूक करताना आढळून आल्यास तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे  (संपर्क  : ८४८३०३८९५३) यांनी नागरिकांना केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!