SR 24 NEWS

इतर

जवाहर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भीमगीत गायनातून अभिवादन!

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम व 135 व्या जयंतीनिमित्त जवाहर महाविद्यालय अणदूर येथे भीम गीत गायन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव रामचंद्र दादा आलूरे यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी,उपप्राचार्य डॉ.मल्लिनाथ लंगडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम, दै. लोकमतचे पत्रकार दयानंद काळुंखे ,संयोजक डॉ. सुनील राजपूत डॉ. मल्लिनाथ बिराजदार, डॉ. विवेकानंद वाहुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना रामचंद्र आलूरे म्हणाले की, महात्मा बुद्ध, महात्मा बसवेश्वर,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी दाखविलेल्या मार्गावरती आपण वाटचाल करीत आहोत, कसल्याही प्रकारचे सोय नसताना त्यांनी जीवनात संघर्ष केले.

कर्तृत्व सिद्ध केले म्हणून त्यांचे विचार आत्मसात करावे त्यांचे जीवन चरित्र वाचावे कारण वाचाल तर वाचाल संघर्षाशिवाय यश नाही. स्वतः जळाल्याशिवाय प्रकाश मिळत नाही म्हणून पंचशील तत्त्वाचे पालन करूया असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी केले. भीम गीत अभिवादन कार्यक्रमात पंचशील गायन पार्टीचे अध्यक्ष कैलास गायकवाड व त्यांचे सहकारी, काशिनाथ कांबळे अँड पार्टी सोलापूरचे अध्यक्ष काशिनाथ कांबळे व त्यांचे सहकारी,पंचशील गायन पार्टी केशेगाव चे अध्यक्ष रमेश कांबळे व त्यांचे सहकारी,न्यू अमर गायन पार्टी निलेगाव अध्यक्ष चंद्रकांत दुपारगुडे व त्यांचे सहकारी यांनी भीम गीताचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जयंती कशाप्रकारे असावी याचा एक आदर्श नमुना म्हणून या गायकांचे निश्चितच योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून आले. दोनच राजे इथे गाजले, मनुचे मान आहे, मानाचे स्थान आहे.

जयंती भीमाची माझ्या जयंती भिमाची, बोले गाव गाव सारे,गाव भिमाई चा बाळ त्याच नाव भीमराव, थोर कृपा भीमाची गातो गाणी रक्ताचे करतो पाणी, संत ज्योतिबा गौतमाला, माझे वंदन पहिले भीमाला, वाळू देत वाती, लावू प्राणज्योती ,बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या असे गीताच्या माध्यमातून संदेश दिला. काय सांगावं माझ्या भिमाची ख्याती आदिवासी समाजातली द्रौपदी झाली राष्ट्रपती, संविधान ठरलं सर्वांच्या फायद्याचं अशा अनेक गीत गाऊन प्रबोधन केले. सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक डॉ. सुनील रजपूत सूत्रसंचालन डॉ. मल्लिनाथ बिराजदार डॉ. प्रसन्न कंदले व आभार डॉ. विवेकानंद वाहुळे यांनी मानले विजयकुमार बसवंत बागडे, संतोष चौधरी, दिलीप चव्हाण, महादेव काकडे, नामदेव काळे, शुभांगी स्वामी, गणेश सर्जे यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!