राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) : शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी राहुरी फॅक्टरी येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये करण्यात आला. यावेळी ९०० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या सहकार्याने आणि पुणे येथील उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा स्तुत्य उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरतो आहे.कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते हर्ष तनपुरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे, संचालक अशोक उऱ्हे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे, उद्योजक किशोर पंडित, राहुरी नोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश साबरे, प्राचार्य उत्तमराव खुळे, पर्यवेक्षक तेलोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना दीपक त्रिभुवन म्हणाले, “शांती चौक मित्र मंडळ सामाजिक आणि धार्मिक कार्यात सातत्याने सक्रिय असून मागील वर्षी श्रीरामपूर मतदारसंघातील शाळांमध्ये १ लाख वह्यांचे वाटप करण्यात आले होते. यंदा संपूर्ण राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्येही हे वह्य वाटप करण्यात येणार आहे.”प्राचार्य उत्तमराव खुळे यांनी मंडळाचे आणि साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेचे आभार मानले आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळते आणि शाळेच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो.”
कार्यक्रमासाठी प्रकाश सोनी, किशोर कोबरने, सुनील विश्वासराव, सुनील संचेती, अजित येवले सर, नितीन डंबाळे, दादा जाधव, साई त्रिभुवन, प्रवीण पाळंदे यांच्यासह शांती चौक मित्र मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम केवळ वह्यांचे वाटप न राहता सामाजिक जाणिवा जागृत करणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरत आहे.
शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये वह्यांचे वाटप

0Share
Leave a reply













