राहुरी (सोमनाथ वाघ) : राहुरी पोलिसांना १३ सप्टेंबर रोजी मिळालेल्या खबरीवरून १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बारागाव नांदूर परिसरातील मुळा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राहुरी पोलिसांनी छापा टाकून अज्ञात वाळू तस्करांनी उपसा केलेली तब्बल ३० ब्रास वाळू, ज्याची अंदाजे किंमत तीन लाख रुपये आहे, असा मोठा साठा जप्त केला. याशिवाय वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेला अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचा चप्पू देखील जप्त करण्यात आला.
एकूण तीन लाख ४५ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल माननीय तहसीलदार श्री. नामदेव पाटील यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी, मौजे बारागाव नांदूर सौ. मरकड मॅडम यांच्या ताब्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी देण्यात आला आहे.
सदरची कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोहेका विकास वैराळ, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गीते व सागर नवले यांनी केली.
बारागाव नांदूर येथे मुळा नदीपात्रातून अवैध वाळू उपश्याचा डाव राहुरी पोलिसांनी लावला उधळून – तब्बल ३.४५ लाखांचा मुद्देमाल राहुरी पोलिसांकडून जप्त

0Share
Leave a reply













