नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : मणिपूर मध्ये गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढत येथे पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सुपुत्राने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे . खा. डॉ. अजित गोपछडे हे भाजपाचे मणिपूर प्रभारी असून ते गेल्या दोन वर्षापासून मणिपूरमध्ये सातत्याने भेटी देऊन येथे शांतता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने योगदान देत आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये शांतता निर्माण होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूर येथे तब्बल सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या विकासाची पायाभरणी केली आहे. पाऊस सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल दीड तास रोड मार्गे प्रवास करून मणिपूरमध्ये विकास कामांची पायाभरणी केली आहे.
मणिपूर मध्ये फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. गेल्या दोन वर्षापासून येथील परिस्थिती अत्यंत विदारक अशी झाली होती. हिंसाचाराने मानवी जीवनावर मोठे परिणाम झाले होते. अशा परिस्थितीत मणिपूरमध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावा , येथे शांतता स्थापन व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यातच भारतीय जनता पार्टीचे मणिपूर प्रभारी म्हणून खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. अत्यंत मितभाषी असलेल्या खा. डॉ. गोपछडे यांनी मणिपूर मधील विदारक आणि भयानक परिस्थितीतही येथील जनतेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी वारंवार आवाहन करत राहिले. मणिपूर मधील तरुणांशी , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी समन्वय साधत शांतता प्रस्थापित करण्याचे अनुषंगाने प्रयत्न केले. केंद्र सरकार , मणिपूर सरकार, कुकी ऑर्गनायझेशन आणि युनायटेड पीपल्स फ्रंट यांच्यात ऑपरेशन सस्पेन्स एस ओ ओ करार घडवून आणण्यामध्ये ही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे . या कामात त्यांना ईशान्य राज्यांचे प्रभारी, भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. संबित पात्रा, भाजपा मणिपूर प्रदेश अध्यक्षा श्रीमती अधिकारिमायुम शारदा देवी, माजी मुख्यमंत्री श्री नोंगथोंबम बीरेन सिंग तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी यांची मोठी मदत मिळाली. शिवाय मणिपूर भाजपाचे योगदानही त्यांनी मिळविले आहे. त्यामुळे आता मणिपूर पूर्वपदावर आले असून या ठिकाणी विकासाची नवी गंगा सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूर मध्ये तब्बल 7300 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. आज मनिपुर मध्ये जोरदार पाऊस सुरू होता . अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरने प्रवास करणे ही कठीण होते. परंतु मणिपूरच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल दीड तास रस्ता मार्गे प्रवास करत विकास कामासाठी ते उपस्थित राहिले. ऑनलाइन नव्हे तर प्रत्यक्ष येऊन कामाच्या विकासाच्या कामाची त्यांनी पायाभरणी केली आणि मणिपूरच्या नव्या विकासाचा नवा मार्ग त्यांनी निर्माण केला आहे . या दौऱ्यापूर्वी भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे मनिपुर मध्ये आयोजनाच्या दृष्टीने गेले होते. तेथे चार दिवस राहून येथील सुरक्षा यंत्रणेच्या भेटीगाठी घेतल्या. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्क बैठका घेऊन येथील जनतेत त्यांनी एक नवा विश्वास निर्माण केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यस्था अबाधित होत आहे . दरम्यान पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सरकार आणि कुकी संघटनांमध्ये एक करारही करण्यात आला आहे . याकरारानुसार मणिपूरला नागालँड – ईशान्य राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग एन एच 2 आता खुला करण्यात आला आहे. मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून हा महामार्ग बंद करण्यात आला होता. हा मार्ग कुकी परिसराला मैतेई परिसराशी जोडतो. आता या मार्गावर लोकांची आणि आवश्यक वस्तूंची वाहतूक अखंडित सुरू होणार आहे. केझेडसीने आश्वासन दिले आहे की, भारत सरकारने तैनात केलेल्या सुरक्षा दलाला ते सहकार्य करतील , जेणेकरून एन एच 2 वर कायमस्वरूपी शांतता राखता येईल.देशविदेशातुन आवागमन करणाऱ्या पर्यटकांना याचा लाभ होईल, व्यापारी दळणवळण वाढेल अशा विविध अंगाने महाराष्ट्राच्या सुपुत्राने मणिपूर मध्ये कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने विविध स्तरावर पडद्यामागची भूमिका पार पडत खारीचा वाटा उचला आहे.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राचेही योगदान : खा. डॉ. अजित गोपछडे यांचा खारीचा वाटा ; पंतप्रधानांनी केली 7300 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी

0Share
Leave a reply













