SR 24 NEWS

इतर

राहुरी तालुक्यात ‘विश्वधन’ निधी संस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

Spread the love

राहुरी प्रतिनिधी  : “तुमचा विश्वास, आमचा हेतू” या ब्रीदवाक्याशी प्रामाणिक राहून अल्पावधीतच ठेवीदारांचा भक्कम विश्वास संपादन करणारी विश्वधन मल्टीपर्पज मानोरी निधी लिमिटेड ही संस्था राहुरी तालुक्यात विश्वासार्ह आर्थिक संस्थे म्हणून वेगाने नावारूपास येत आहे.मानोरी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभहस्ते नुकताच विश्वधन मल्टीपर्पज मानोरी निधी लिमिटेड संस्थेच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे भव्य लोकार्पण उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व राहुरी तालुक्याचे भूषण श्री. राजूभाऊ शेटे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. संदीप दादा आढाव, पोपटराव पोटे, बापूसाहेब वाघ, डॉ. अजिंक्य आढाव, अनिल तनपुरे, अशोक खुळे, अक्षय पिसाळ, अभिजीत कोहकडे, किशोर महाराज, तुषार चोथे, मनोज ठुबे, किरण आढाव, शीतल हिवार्डे, विवेक वाघ, श्वेता कांबळे, अक्षय खुळे, मनोज आढाव, ध्रुप आढाव, कुणाल बाचकर यांच्यासह मानोरी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना चेअरमन श्री. संदीप दादा आढाव यांनी सांगितले की, विश्वधन निधी संस्था ठेवीदारांचा विश्वास कायम राखत पारदर्शक, सुरक्षित व नियमानुसार आर्थिक व्यवहार करण्यावर भर देत आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्थेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. येणाऱ्या नवीन वर्षात ठेवीदार व कर्जदारांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देण्याबरोबरच सामाजिक व आर्थिक उपक्रम राबविण्यास संस्था कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रमुख पाहुणे श्री. राजूभाऊ शेटे पाटील यांनी विश्वधन मल्टीपर्पज मानोरी निधी लिमिटेड संस्थेच्या कार्याचे कौतुक करत, अल्पावधीत संस्थेने निर्माण केलेला विश्वास हा निश्चितच उल्लेखनीय असल्याचे सांगितले. ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीसाठी अशा संस्थांची नितांत गरज असून, विश्वधन संस्था भविष्यात अधिक व्यापक स्तरावर कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिस्तबद्ध प्रशासन, ग्राहकाभिमुख धोरणे व विश्वासार्ह सेवेमुळे विश्वधन मल्टीपर्पज मानोरी निधी लिमिटेड संस्थेने राहुरी तालुक्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, आगामी काळात संस्थेच्या कार्यामुळे परिसराच्या आर्थिक विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!