विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण (पारनेर) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्राचीन व पुरातन पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री ढोकेश्वरची उद्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी ११ ऑगस्ट रोजी यात्रा भरणार आहे. पंचक्रोशीतील श्रावण महिन्यात ढोकी येथिल ढोकेश्वर मंदिर परिसरातील सर्वात मोठी यात्रा भरते. टाकळी ढोकेश्वर येथिल ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त श्री ढोकेश्वर मंदिर येथे भव्य विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विशाल भंडाऱ्याचे हे या वर्षी १७ वे वर्ष पूर्ण होत आहेत.
यावर्षी समाधानकारक पाऊसमान असल्याने दर्शनासाठी व यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांची गर्दी होईल,असा अंदाज आहे. महाराष्ट्र राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातून ढोकेश्वरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. यात्रेमध्ये विविध खेळणी, पाळणाघरे, खाऊची दुकाने, संसारोपयोगी वस्तूंची दुकाने दाखल झाले आहेत.
यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी विशाल भंडाऱ्याच्या माध्यमातून २१ क्विंटल साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे व पिण्याच्या पाण्याची सोय टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांनी चांगल्याप्रकारे नियोजन केले आहे. पंचक्रोशीतील दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सोमवारी सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
हर हर महादेव..! सोमवारी भरणार श्री ढोकेश्वराची सर्वात मोठी यात्रा, टाकळीढोकेश्वर ग्रामस्थांतर्फे विशाल भंडाऱ्याचे आयोजन

0Share
Leave a reply












