तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुडे : आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्याचे काँग्रेसचे युवा नेते ऋषिकेश भैय्या मगर यांच्यासह असंख्य सरपंच, उपसरपंच, बाजार समिती सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवार दिनांक 16 रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीत अप्रत्यक्ष भाजपला धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपा मध्ये गेलेले सुनील चव्हाण यांच्याबरोबर न जाता असंख्य कार्यकर्ते अस्वस्थ होते. भाजपामध्ये न जाता सक्षम असलेल्या विरोधी पक्ष ठाकरे गटात जाणे कार्यकर्त्यांनी पसंत केल्याने आगामी काळात तुळजापूर तालुक्यातील राजकारणात कलाटनी मिळणार का हा प्रश्न मात्र संभ्रम निर्माण करणार आहे असल्याचे बोलले जात आहे.
मगर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते एकत्र येत चव्हाण यांच्या विरोधात बंड पुकारत ठाकरे गटात प्रवेश केल्याने आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणात कलाटनी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
ऋषिकेश मगर यांनी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील रखडलेल्या योजना, व सर्वांगीण विकासासाठी पक्षप्रवेश केल्याचे सांगितले. त्यांच्या समवेत जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे, काठीचे सरपंच सुजित हंगरकर, वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे, उद्योजक मोहन जाधव, वाडी बामणीचे उपसरपंच अमर माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे, सरपंच कोकरे, वडगाव लाखचे सरपंच बालाजी चंदनशिवे, दिलीप सावंत, दादासाहेब काटगावकर, प्रभाकर घोगरे, शहाजी देवगुंडे, मनोज गायकवाड, सौदागर जाधव, राजाभाऊ नळेगावकर, प्रभाकर घोगरे, रामचंद्र चंदनशिवे, समाधान माने, शत्रुघ्न देवकर सह या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक श्याम पवार, संघटक राज अहमद पठाण, डॉ. जितेंद्र कानडे, बाळकृष्ण पाटील, जगन्नाथ गवळी, राहुल खपले, सुधीर कदम, अर्जुन साळुंखे, सुनील जाधव, चेतन बनगर, बालाजी पांचाळ, कृष्णात मोरे, अनिल छत्रे, नवनाथ जगताप यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a reply













