SR 24 NEWS

इतर

राहुरीतील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या विरोधात नाथ प्रतिष्ठानचा मोर्चा ; खड्ड्यांमध्ये अंघोळ करून युवकाचा निषेध

Spread the love

राहुरी प्रतिनिधी – 17 सप्टेंबर ( ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था, सतत होणारे अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास या पार्श्वभूमीवर नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. संस्थापक सौरभ उंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नगर परिषदेपर्यंत नेण्यात आला.या वेळी सौरभ उंडे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “नवरात्र उत्सवाच्या आधी रस्त्यांवरील खड्डे न बुजवल्यास पुन्हा नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला जाईल.”कुलकर्णी हॉस्पिटल, शुक्लेश्वर चौक, विद्यामंदिर शाळा परिसर, शिवाजी चौक, आणि मेन रोड मार्गे मोर्चा नगर परिषद कार्यालयावर पोहोचला. या मोर्चामध्ये महिलांसह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरवस्था होते. खड्ड्यांमुळे विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मोर्चादरम्यान “खड्डे मुक्त राहुरी आमचा हक्क”, “कर भरतो आम्ही – रस्ता द्या तुम्ही” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान एका युवकाने मोठ्या खड्ड्यात बसून त्यातील पाण्याने अंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या आगळ्या वेगळ्या प्रकारामुळे मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले.

मोर्चात सौरभ उंडे, सागर शेटे, ओंकार कासार, नाना शिंदे, सचिन ढवळे, सचिन राऊत, आरिफ शेख, जयंत उंडे, सागर उदावंत, अर्जुन बोराडे, निलेश शिरसाठ, युवराज तनपुरे, रवी तनपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर महिलांमध्ये सीमा उंडे, नूतन उंडे, अनिता उंडे, जानवी उंडे, सुनिता शेटे, ताराबाई लोखंडे, इंदुबाई साळवे, प्रमिला कदम, साक्षी लोळगे यांचा सहभाग लक्षणीय होता.

मोर्चानंतर नागरिकांचे निवेदन प्रशासनाच्या वतीने प्रशासक विकास घटकांबळे यांनी स्वीकारले. त्यांनी नाथ प्रतिष्ठानला लेखी आश्वासन देत सांगितले की, “नवरात्र उत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल.”नाथ प्रतिष्ठानच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!