राहुरी प्रतिनिधी (१६ जुलै) : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे महादेव टेकडी येथे नवीन श्री विठ्ठल-रूख्मिणी मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून या मंदिराचा लोकार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होणार आहे. शनिवार दि. १९ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता या सोहळ्याची सुरुवात भव्य मिरवणुकीने होणार आहे. त्यानंतर रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी विठ्ठल-रूख्मिणी मूर्तीपूजन आणि होमहवनाचा कार्यक्रम होणार आहे.मुख्य प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा सोमवार दि.२१ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.
या शुभप्रसंगी बालब्रह्मचारी ह.भ.प. महंत रामेश्वर महाराज राऊत (शास्त्रीजी) (अध्यक्ष, श्री सदगुरु पंढरीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था, घोडेगाव) यांच्या पावन हस्ते नवीन मंदिराचे लोकार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. यावेळी सर्व ग्रामस्थ व मंदिर देवस्थान मंडळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सोमवारी दि.२१ जुलै रोजीच सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह.भ.प. रामेश्वर महाराज राऊत यांचे जाहीर हरिकिर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, याचे अन्नदाते डॉ. बाळासाहेब रायभान तोडमल आहेत. मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता होत असून, त्या निमित्ताने सकाळी १० ते १२ या वेळेत शब्दप्रभू ह.भ.प. अंकुश महाराज जगताप (नेवासा) यांचे जाहीर हरिकिर्तन होईल.
त्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसीय दिव्य अध्यात्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून पावन लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव युवा मंच व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
गोटुंबे आखाडा येथे नूतन श्री विठ्ठल-रूख्मिणी मंदिराचे लोकार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

0Share
Leave a reply














