श्रीरामपूर प्रतिनिधी / जीतू शिंदे : श्रीरामपूर शहरात २०२२ साली चर्चेत आलेल्या मुल्ला कटर लव्ह जिहाद प्रकरणातील एका २० वर्षीय महिलेला धमकी दिल्याच्या आरोपावरून कुख्यात मुल्ला कटर उर्फ इमरान कुरेशीचा भाऊ रिजवान कुरेशी व भाजपाचे माजी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायदा व इतर विविध कलमान्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी तिला “मुल्ला कटरविरोधात न्यायालयात काहीही बोलायचं नाही” अशी धमकी दिली. त्यासोबतच जातीवाचक अपमान, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रकाश चित्ते यांनी या प्रकरणी न्यायालयात न्याय मागणार असल्याचे समजते.
दरम्यान, याच मुल्ला कटर लव्ह जिहाद टोळीविरोधात ०१ सप्टेंबर २०२२ रोजी शिवप्रहार संघटनेने माजी PSI सुरजभाई आगे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. हे प्रकरण त्यानंतर राज्य विधानसभेतही मांडण्यात आले होते. तत्कालीन गृहमंत्र्यांच्या निर्देशावरून मुल्ला कटर व त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून संबंधित आरोपी जेलमध्ये आहेत.
महिलेच्या तक्रारीवरून कुख्यात मुल्ला कटरचा भाऊ व प्रकाश चित्ते यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












