SR 24 NEWS

जनरल

मुळा धरणाजवळ मृतदेहाची चर्चा ; पोलीस पथक घटनास्थळी धावले, अखेर समोर आले हास्यजनक सत्य

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात एका ओढ्यातील पाण्यावर एका पुरुषाचा मृतदेह तरंगत आहे. अशी खबर दि. ५ जुलै रोजी सकाळच्या सुमारास मिळाल्याने पोलिस पथककात प्रचंड खळबळ उडाली.  राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात एक तलाव असून शेजारी एक ओढा आहे. आज दि. ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान पॅन्ट व शर्ट घातलेला एका पुरुषाचा मृतदेह त्या ओढ्यातील पाण्यावर तरंगताना दिसून आला.

परिसरात भितीचे वातावरण पसरून मृतदेह कोणाचा आहे हे पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. या बाबत पोलीस प्रशासनाला खबर मिळाली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ताबडतोब सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ, हवालदार सागर नवले, चालक साखरे आदि पोलिस पथक बरोबर घेऊन घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ओढ्यातील पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढला.

तो मृतदेह पाहून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह सर्वांनीच डोक्याला हाथ मारला. तो कोणत्या पुरुषाचा मृतदेह नसून शेतात पाखरांना भिती दाखवण्यासाठी लावले जाणारे बुजगावणे होते. बुजगावणे पाहून पोलिस पथकाने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र उपस्थित असलेल्या नागरीकांना हसू आवरता आले नाही.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!