SR 24 NEWS

राजकीय

नांदेड–लातूर, नांदेड–बिदर व बोधन–लातूर मार्ग प्रकल्प ‘फास्ट ट्रॅक’वर : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्यावर केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद 

Spread the love

नांदेड प्रतिनिधी /  धम्मदिप भद्रे : नांदेड लातूर , नांदेड बीदर, बोधन लातूर या रेल्वे मार्गाचे काम जगद गतीने करावे यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याच पाठपुराव्याला अनुसरून केंद्र सरकार द्वारे हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी फास्ट ट्रॅक काम सुरू असल्याचे सांगितले.

राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत यानुषंगाने विचारलेल्या अतारांकित प्रश्न क्र. ७६५ ला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या उत्तरानुसार, नांदेड-लातूर (१०४ किमी), नांदेड-बिदर (१५७ किमी) आणि बोधन-लातूर (१३५ किमी) या नवीन रेल्वे मार्गांच्या उभारणीसाठी सर्वेक्षण आणि डीपीआर प्रक्रियेत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.

नांदेड–लातूर मार्गासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नांदेड–बिदर मार्गाचा डीपीआर २०२१ मध्ये २३५४ कोटी रुपयांमध्ये तयार झाला असून महाराष्ट्र सरकारने ५० टक्के खर्च आणि जमीन देण्यास संमती दर्शविली आहे, तर कर्नाटक सरकारची संमती अद्याप प्रलंबित आहे. बोधन-लातूर मार्गासाठी सर्वेक्षण मंजूर झाले आहे आणि डीपीआर तयार केला जात आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या मते, प्रकल्पांच्या मंजुरी व अंमलबजावणीचा वेग राज्य सरकारांकडून जमीन उपलब्धता, वैधानिक मंजुरी, नीति आयोग व वित्त मंत्रालयाची अनुमती यांसह अनेक घटकांवर अवलंबून आहे. यासोबतच महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये रेल्वे पायाभूत सुविधांसाठी गेल्या काही वर्षांत अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात तरतूद २० पट तर कर्नाटकमध्ये ९ पट वाढली आहे. दोन्ही राज्यांत अनेक नवीन मार्ग, दुहेरीकरण व तिसरी ,चौथी लाईन प्रकल्प जलद गतीने पूर्ण किंवा प्रगतीपथावर आहेत.

नांदेड-लातूर, नांदेड-बिदर आणि बोधन-लातूर हे तिन्ही मार्ग तेलंगणा , महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रदेशाला पर्यायी आणि थेट कनेक्टिव्हिटी देणारे महत्त्वाचे प्रकल्प ठरणार आहेत. मंजुरी, जमीन संपादन आणि इतर प्रक्रियेच्या टप्प्यानुसार या प्रकल्पांना पुढील गती दिली जाणार आहे. असेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खा. डॉ. अजित गोपछडे हे नांदेड जिल्ह्यातील अत्यंत महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राकडे आग्रही पाठपुरावा करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!