राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी पोलीस वसाहतीत श्री दत्त जयंतीनिमित्त धार्मिक उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या पुढाकाराने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात भजन व गायन सेवेमुळे झाली. भक्तीगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आणि वातावरण सर्वत्र भक्तिमय झाले. श्रद्धावानांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. यानिमित्त सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व शांततेत पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी विशेष नियोजन केले होते. दत्त जयंतीचे औचित्य साधत एकोपा, श्रद्धा आणि समाजातील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, समाधान फडोळ, गणेश वाघमारे, नितीन सप्तर्षी, विष्णु आहेर, सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, भाऊसाहेब आव्हाड, हवालदार अशोक शिंदे, संदिप ठाणगे, विजय नवले, पोलीस नाईक जालिंदर साखरे, संभाजी बडे, कॉन्स्टेबल अजिनाथ चेमटे, अजिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, सुरज गायकवाड, राहुल यादव, सतीष कुहाडे, नदीम शेख, सचिन ताजने, शेषराव कुटे, चाँदभाई पठाण, अमित राठोड, जयदीप बडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्री दत्त जयंतीचा हा भक्तिपूर्ण सोहळा राहुरी पोलिस वसाहतीत उत्साहात पार पडला.
राहुरी पोलीस वसाहतीत श्री दत्त जयंती उत्साहात साजरी; भक्तिमय कार्यक्रमांना प्रतिसाद – पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुढाकार

0Share
Leave a reply












