राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात दत्त जयंतीनिमित्त आयोजित गुरुचरित्र पारायण सप्ताहाचा सांगता सोहळा मोठ्या भक्तिभावात उत्साहात संपन्न झाला. सप्ताहभर पारायण, अभिषेक, भूपाळी, प्रदक्षिणा, अखंड नामस्मरण, दुर्गा सप्तशती वाचन यांसह विविध धार्मिक उपक्रमांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सप्ताहातील प्रमुख आकर्षण ठरलेला चंडीयाग सोहळा दिव्य आणि दैदिप्यमान वातावरणात पार पडला. यज्ञकुंडातील अग्निहोत्र, मंत्रोच्चार आणि सेवेकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे परिसर भक्तिभावाने उजळून निघाला. धार्मिक उपक्रमांनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
पारायणात महिला भाविकांचा विशेष उत्साह पाहायला मिळाला. विजया बाचकर, विजया पोटे, वैशाली थोरात, शिवानी आढाव, मनिषा आढाव, रेखा वाघ, मयुरी वाकचौरे, स्वाती वाघ, निर्मला आढाव, देवयानी आढाव, वैशाली आढाव, वैष्णवी थोरात, शुभांगी कोहकडे, कविता आढाव, वंदना काळे, निता आढाव, साखरबाई तनपुरे, जयश्री खुळे, सुरेखा शिंदे आदी महिलांनी सामूहिक पारायण व सेवा उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. दरम्यान, रेणुका माता मंदिर परिसरातही स्वामी समर्थ पारायणाची सुरुवात झाल्याने मानोरी परिसरात सर्वत्र उत्सवमय वातावरण पसरले आहे.
आगामी दिवसांत केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या अन्नदान उपक्रमासाठी मानोरी केंद्रातर्फे वर्गणी संकलन सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
Leave a reply













