प्रतिनिधी (जावेद शेख) : राहुरी तालुक्यातील धामोरी बु येथील रहिवासी व निवृत्त बँक अधिकारी कै. कारभारी गंगाधर दुधाट यांचे बुधवार, दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते एडीसी बँक राहुरी येथील अधिकारी संजय कारभारी दुधाट यांचे वडील होत.
कै. दुधाट यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात चार मुली, सुन, नातवंडे तसेच भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने धामोरी बु परिसरात शोककळा पसरली असून गावातील मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवाराने त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
धामोरी बुद्रुक येथील निवृत्त बँक अधिकारी कै.कारभारी गंगाधर दुधाट यांचे अल्पशा आजाराने निधन

0Share
Leave a reply












