डिग्रस (राहुरी) : श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सेवा मार्ग, डिग्रस आयोजित दत्त जन्मोत्सव उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री तळोले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांना हस्तशास्त्र, मुद्राशास्त्र, संख्याशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विविध शास्त्रांवर अनमोल मार्गदर्शन करण्यात आले.स्वामी सेवा मार्गातर्फे वर्षभर विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. दत्त जयंती उत्सवासाठी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. गाव परिसरातील भाविकही मोठ्या प्रमाणावर दर्शन, नामस्मरण व कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
शनिवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सांगता सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठ संचालनाची जबाबदारी शैला पारधे, मिराबाई येणारे, विकास गावडे, किरण पाचारणे, अनिकेत शिंदे व अमोल खोडके यांनी समर्थपणे पार पाडली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनात विकास गावडे, किरण पाचारणे, अनिकेत शिंदे, अमोल खोडके, प्रसाद भिंगारदे, निलेश भिंगारदे,चैतन्य पारधे, किरण यादव, संदीप नरोटे, संदीप बनसोडे, विजय बनसोडे, सिद्धार्थ रोडगे, आदिनाथ बनसोडे, नवनाथ पाचारणे, यश भिंगारदे,गोरखनाथ राऊत महिलांमध्ये शीला पारधे, मीरा येणारे ,योगिता दारकुंडे मॅडम,शशिकला भिंगारदे, प्रचिती भिंगारदे , सिया, दारकुंडे,राजश्री भिंगारदे,मीरा गायकवाड, स्नेहल पारधे, अश्विनी बेल्हेकर ,ललिता बेल्हेकर, हर्षदा कोकाटे ,ऋतुजा गावडे ,शिंदे ,महानोर ,काजल मेटे ,पायल टिक्कल अनुजा शिंदे ,सिद्धी कोकाटे ,अनिता कोकाटे यांचे विशेष योगदान राहिले व उत्सवकार्याची जबाबदारी निभावली तसेच विकास गावडे आणि निकिता गावडे या यजमान जोडीच्या हस्ते पूर्णाहुती देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
केंद्रप्रमुख म्हणून महिला सेवेकरी कल्पना भिंगारदे, वैशाली टेके ,तसेच पुरुष सेवेकरी किरण पाचारणे, विकास गावडे, अमोल खोडके आणि चैतन्य पारधे यांनी संपूर्ण उत्सवाची धुरा समर्थपणे सांभाळली.
डिग्रस येथे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग यांच्यावतीने दत्त जन्मोत्सव भक्तिभावात संपन्न

0Share
Leave a reply












