SR 24 NEWS

सामाजिक

राहुरी कृषी विद्यापीठ येथे उद्या 29 जून रोजी रंगणार “स्वरानुभूती” संगीत महोत्सव 

Spread the love

राहुरी विद्यापीठ : निनाद फाउंडेशन, राहुरी संचालित निनाद संगीत विद्यालय आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वरानुभूती” हा विशेष संगीतसंध्या कार्यक्रम आणि विद्यार्थी प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवार, २९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:०० ते ९:०० या वेळेत डॉ. नानासाहेब पवार सभागृह, म.फु.कृ.वि. राहुरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. शरद गडाख( कुलगुरू, म.फु.कृ.वि. राहुरी), डॉ. आर. डी. बनसोड (मा. अधिष्ठाता, म.फु.कृ.वि. राहुरी), डॉ. संदीप पाटील (वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, म.फु.कृ.वि. राहुरी) आणि डॉ. शिवाजीराव पाटील (प्राध्यापक, म.फु.कृ.वि. राहुरी) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत अशी माहिती संगीत शिक्षक श्री. राजेंद्र कोतकर आणि प्रा. मनोज बापूसोहेब तेलोरे यांनी दिली .

यामध्ये गायन आणि तबला वादनाचा समावेश असेल. सायंकाळचे प्रमुख आकर्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक गुरूवर्य पवन श्रीकांत नाईक यांची बहारदार संगीत मैफल आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र क्षीरसागर हे करणार आहेत . साथसंगत म्हणून संवादिनीवर श्री. कल्याण मुकटे आणि तबल्यावर श्री. श्रीधर दरवडे यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहे.

संयोजक पाठक प्रतिनिधी म्हणून डॉ. विवेकानंद कुलकर्णी, डॉ. नंदकुमार भुते, डॉ. भगवान देशमुख, डॉ. संतोष वाघमोडे आणि श्री. पांडुरंग कुसळकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहे .यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करणार आहे आणि त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .

कार्यक्रम वेळेवर सुरु होईल आणि कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला संगीतप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!