SR 24 NEWS

सामाजिक

संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा अणदूर येथे सन्मान

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने अणदूर येथील जि प प्रा शाळा वत्सलानगर येथील गुणवंत शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते अरविंद गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर महाविद्यालयातील डॉ मल्लीनाथ बिराजदार, मुख्याध्यापक सुरेखा दराडे,ग्रा पं सदस्या अनुसया कांबळे, जेष्ठ नागरिक बाबुराव हागलगुंडे, पोलीस पाटील जावेद शेख, अणदूरकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अजय अणदूरकर,संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या संचालिका अनिता काळुंके,सेवानिवृत्त बॅंक शाखाधिकारी भानुदास सुरवसे, डॉ प्रसन्न कंदले,शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष सोमनाथ लंगडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने जि प प्रा शाळा वत्सलानगर येथील शिवदास भागवत यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा हे पुस्तक निर्माण केल्याने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर शाळेची गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापिका सुरेखा दराडे,एस बी स्वामी,बि बि पांचाळ,व्ही व्ही आडम,व्हि आर खलाटे,डि आर आरदवाड,एस डि गीरी,बि बि घोडके, पल्लवी लंगडे, गणेश नन्नवरे या शिक्षक कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ एम बी बिराजदार,सुरेखा दराडे, पत्रकार शिवशंकर तिरगुळे,डॉ प्रसन्न कंदले, लेखक शिवदास भागवत यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा बालकल्याण समीतीचे सदस्य दयानंद काळुंके यांनी केले, सुत्रसंचलन माजी सरपंच प्रबोध कांबळे यांनी तर आभार एस डी गीरी यांनी मानले. यासाठी शिवशंकर तिरगुळे,सचिन तोग्गी,संजीव आलूरे,चंद्रकांत मुळे, सिकंदर शेख,आण्णाराव चव्हाण,यांच्यासह संत तुकाराम सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सायंकाळ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!