ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ब्रम्हपुरी तालुक्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयासह तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये विविध जनहितकारी उपक्रम राबविण्यात आले.१ ऑगस्ट रोजी “महसूल दिन” व सप्ताहाचा शुभारंभ साजरा करण्यात आला. २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.२ ऑगस्ट रोजी अतिक्रमण नियमन अंतर्गत पात्र असलेल्या दोन लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले.३ ऑगस्टला तालुक्यातील विविध पांदन रस्त्यांवर स्थानिकांच्या सहकार्याने १५० झाडांची लागवड झाली.४ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत शैक्षणिक प्रवेश व इतर शासकीय कामकाजासाठी आवश्यक १,२७५ दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले.
५ ऑगस्ट रोजी DBT लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करून ५५० लाभार्थ्यांचे अधिकृतरण (Authorization) करण्यात आले.६ ऑगस्ट रोजी महसूल जमीन अधिनियम १९६६ अंतर्गत गायरान जमिनीवरील ३६८ अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच कुळ कायदा सुधारणा अंतर्गत पात्र शेतकऱ्यांकडून महसूल आकारणीची कार्यवाही झाली.
याशिवाय, पर्यावरणपूरक धोरणांतर्गत नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून M-Sand धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून तालुक्यात M-Sand युनिट स्थापनेसाठी माहिती संकलन व गुंतवणूक प्रोत्साहनाची प्रक्रिया सुरू आहे.७ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाचा समारोप तहसीलदार मा. सतिश मासाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपविभागीय अधिकारी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी श्री. नरेश बोधे यांनी केले.
Leave a reply












