राहुरी (प्रतिनिधी) – रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी समाजभावनेचे उत्तम उदाहरण घालत हरवलेल्या आई-मुलीला सुखरूप शोधून त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले.दोन दिवसांपूर्वी घर सोडून गेलेल्या महिलेचा व दोन वर्षांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये मनुष्य बेपत्ता रजी. क्र. 139/2025 नुसार नोंद करण्यात आली होती. महिलेबाबत कुठलीही ठोस माहिती उपलब्ध नसताना, पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे अथक प्रयत्न करून अखेर आई-मुलीचा माग काढला. मोहटा देवी परिसर, तालुका पाथर्डी येथून दोघींना सुखरूप शोधून राहुरी पोलीस स्टेशनला आणण्यात आले व नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात आले.
ही कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, उपपोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री. डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शोध पथकात पो.नि. संजय आर. ठेंगे, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. अशोक शिंदे, पो.कॉ. अंजली गुरवे (राहुरी पोलीस स्टेशन), तसेच पो.ना. संतोष दरेकर व पोहेका सचिन धनाड (अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर – मोबाईल सेल) यांचा समावेश होता.
राहुरी पोलिसांचे आगळेवेगळे रक्षाबंधन,घर सोडून गेलेल्या महिलेचा व दोन वर्षांच्या मुलीचा सुखरूप शोध

0Share
Leave a reply












