सोनई प्रतिनिधी (मोहन शेगर ) : घोडेगाव येथील महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ गंगाराम चौगुले यांना अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे घोडेगाव येथे काशिनाथ चौगुले हे बहुजन समाजातील ज्यांच्या डोक्यावरून माता पित्याचे छत्र हरपले अशा अनाथ मुला मुली साठी मोफत वस्ती गृह चालवित आहेत समाजातील ज्यांना कोणी नाही अशा अनाथ मुलांना निराधार भटक्या विमुक्त ऊसतोड कामगार वीट भट्टी मजूर शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना चांगले संस्कार देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणून चांगले नागरिक बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ते आपल्या संस्थेमार्फत उचलत असून त्यांच्या पालन पोषणाची व शिक्षणाची जबाबदारी उचलत असून आज त्यांच्या या वसतिगृहामध्ये समाजामध्ये ज्यांना कोणी नाही असे 50 बालके असून व वस्तीग्रह मध्ये राहून शिक्षण घेत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून आदर्श समाजसेवक पुरस्कार एका शानदार सोहळ्यामध्ये दिनांक 10 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
या संस्थेच्या वतीने वीर शिवछत्रपती महाराष्ट्ररत्न पुरस्कार, अजिंक्यतारा पुरस्कार 2025 असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्तृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा अहिल्यानगर येथील प्रोफेसर चौक हॉटेल रोज गोल्ड येथे दिनांक दहा रोजी नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे यावेळी नगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुल सौंदर, नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत चौगुले यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व सरांमधून त्यांचे कौतुक होतं आहे.
Leave a reply













