राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलिस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राहुरी पोलिस स्टेशन शोध पथकाने एकूण 40 हरवलेले मोबाईल शोधून काढले असून त्यापैकी काही मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. उर्वरित मोबाईलसाठी मालकांशी संपर्क साधून परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या मोहिमेचे श्रेय पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाला जाते. हरवलेल्या मोबाईलसंबंधी नोंदींचा अभ्यास करून आणि तांत्रिक साधनांचा वापर करत पथकाने हा पराक्रम साध्य केला. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.शोध पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलिस हवलदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख, सचिन ताजने तसेच श्रीरामपुर मोबाईल सेलमधील पोलिस हवलदार सचिन धनाड, संतोष दरेकर आणि रामेश्वर वेताळ यांचा समावेश होता.
राहुरी पोलिसांच्या या कामगिरीचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. हरवलेली मालमत्ता परत मिळाल्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे
Leave a reply













