देवळाली प्रवरा (ता. राहुरी) : येथे चैतन्य उद्योग समूहास पुणे येथील आयकर विभागाचे आयुक्त अजय केसरी यांनी आज (ता. १३ जुलै) रविवारी कुटुंबीयांसह सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी चैतन्य उद्योग समूहाचे विविध उपक्रम व प्रकल्पांची पाहणी केली आणि संस्थेच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी आयुक्त अजय केसरी यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यानंतर आयुक्त केसरी यांनी चैतन्य मिल्क अँड ऍग्रो फार्म आणि चैतन्य एक्वा प्रकल्प यांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी या दोन्ही प्रकल्पांच्या उत्पादन प्रक्रियांचे बारकाईने निरीक्षण केले आणि कृषी व दुग्ध व्यवसायातील अभिनव उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी चैतन्य एक्वाचे चेअरमन संदीप भांड, ज्येष्ठ पत्रकार संजय हुडे, विलास भालेराव, गणेश डावखर, अबूबकर शेख, सुभाष कांबळे, किशोर साळुंके तसेच उद्योग समूहाचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भेटीमुळे स्थानिक पातळीवर सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, चैतन्य उद्योग समूहाच्या सामाजिक व कृषी विकासातील योगदानाचे पुन्हा एकदा अधोरेखन झाले. आयुक्त अजय केसरी यांच्या या सदिच्छा भेटीमुळे उद्योग समूहास प्रोत्साहन लाभले असून, भविष्यातील उपक्रमांमध्ये अधिक ऊर्जा व आत्मविश्वास मिळेल, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
Leave a reply













