प्रतिनिधी / जावेद शेख : नमो फाऊंडेशन , ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि म्युझीक लव्हर्स ग्रुप यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुवार दि. 10 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत जनकल्याण रक्तपेढी अहिल्यानगर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले . इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी होवुन उत्साहपूर्वक रक्तदान केले . जनकल्याण रक्तपेढी, दै . पराक्रमी, राष्ट्रप्रथम न्यूज, एस डब्ल्यू न्यूजचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले .यावेळी म्युझीक लव्हर्स ग्रुपचे संस्थापक विनयजी गुंदेचा , नमो फाऊंडेशनचे मार्गदर्शक रिटायर्ड पी .आय . शिरीषजी बेगडे साहेब, संस्थेच्या सचिव पुनम कानडे उपस्थित होते .
यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव व नमो फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार डॉ . संजय वायकर यांनी सांगितले की , रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असुन प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे . भविष्यात जर आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला काही कारणास्तव रक्ताची गरज पडली तर हेच रक्त संकलन केलेले रक्त उपयोगी पडते . या गोष्टीचा गांभीर्याने प्रत्येक व्यक्तीने विचार करून रक्तदान केले पाहिजे . इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे . भारतात अजुनही रक्तदात्यांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त नाही . रक्तदाना विषयी अजुनही जनजागृती करणे आवश्यक असून आमच्या संस्था व संघटने मार्फत रक्तदानाचे महत्व नागरिकांना पटवुन देत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले .
याप्रसंगी जनकल्याण रक्तपेढीचे शासकीय अधिकारी सागर उंडे, स्मिता बडवे, जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे,तंत्रज्ञ अनिता तरटे, मेघा शिंदे , लांडगे मेडिकलचे प्रो. प्रा.धीरज लांडगे, बेनेडिक्ट जोसेफ , आनंद गायकवाड, विवेक जायगुडे, राधा आल्हाट, शिंदे मॅडम, पत्रकार सचिन गांधी , पंढरीनाथ लांडगे , मिसाळ सर , पवार सर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी आदि उपस्थित होते .
ग्रामीण पत्रकार संघ व नमो फाऊंडेशच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न, आपल्या कुटुंबासाठी तरी प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे – डॉ . संजय वायकर

0Share
Leave a reply












