SR 24 NEWS

राजकीय

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार उदासीन – अजित पाटील यांचा आरोप, राष्ट्रीय समाज पक्षाच्या नियोजन बैठकीत राज्य सरकारवर टीका

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / जीतू शिंदे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाची श्रीरामपूर तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठकी प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील यांनी केला. अजित पाटील म्हणाले, महाराष्ट्रामध्ये रोज आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. बँका शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे. केंद्र सरकारचा अहवाल सांगतो शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचे उत्पन्न अधिकचे आहे. राज्य सरकारची मानसिकता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची नाही. निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण शेतकऱ्यांना नको असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत. शेतकरी विरोधी सरकार राज्यामध्ये सत्तेत बसले आहे त्याला उलथून टाकावे लागेल. शेतकरी कर्जमाफीसाठी सामूहिक लढा उभा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

    राष्ट्रीय समाज पक्षाची श्रीरामपूर तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असून तालुक्यामध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी यावेळी बैठकीमध्ये जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व नगरपालिका निरीक्षकांची निवड करण्यात आली. तसेच अनेक महिलांनी त्यांच्या उपस्थितीत पक्षांमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

जिल्हा परिषद गट निरीक्षक निवड घटनिहाय टाकळीभान गट नंदकुमार खेमनर, बेलापूर गट दादा कुसेकर, दत्तनगर गट डॉ सुनील चिंध्दे, उंदीरगाव गट गणेश राशिनकर, निपाणी वडगाव गट दत्तात्रय कचरे-पाटील तर पंचायत समिती गण निरीक्षक निवड गणनिहाय टाकळीभान गण सटवाजी गाढे, शिरसगाव गण अश्विनी पाचपिंड, बेलापूर गण गोरखनाथ येळे, पढेगाव गण अण्णासाहेब मुंजाळ, दत्तनगर गण सचिन लाटे, उक्कलगाव गण चेतन वडीतके, निमगाव खैरी गण वंदना आढाव, उंदीरगाव गण इनायत अत्तार, कारेगाव गण मुन्ना शेख, निपाणी वडगाव गण नंदकुमार खेमनर यांची निवड करण्यात आली.

श्रीरामपूर नगरपालिका निरीक्षक म्हणून नंदकुमार खेमनर व सचिन लाटे याची निवड करण्यात आली. श्रीरामपूर तालुका महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी सुनिता राजेंद्र भाकरे, तालुका सचिव पदी सुनिता दत्तात्रय वाघ व तालुका संपर्कप्रमुख पदी अश्विनी शिवाजी पाचपिंड यांची निवड महिला आघाडी तालुकाध्यक्षा वंदना आढाव यांनी केली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नानासाहेब जुंधारे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार खेमनर, ज्येष्ठ नेते डॉ सुनील चिंध्दे, दत्तात्रय कचरे-पाटील, वारकरी व कलावंत आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोरखनाथ येळे व तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कलावंत आघाडीच्या वतीने खंडोबाची पगडी घालून आणि संबळ वाजवत अनोख्या पद्धतीने श्रीरामपूर शहरांमध्ये प्रदेश सरचिटणीस अजित पाटील यांचे स्वागत करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!