सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर यांना शिर्डी एक्सप्रेसच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्व व्यक्तीला दिला जाणारा महाराष्ट्र रत्न हा मानाचा पुरस्कार नुकताच अहिल्यानगर येथे हॉटेल संजोग नगर मनमाड रोड या ठिकाणी आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते व यशदाचे ट्रेनर माननीय बबनराव जोगदंड (पुणे) व पत्रकार मनोजकुमार आगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.
यावेळी विचार मंचावर औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार, ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण, उद्योजक रवीशेठ ताठे, संदीप साळवे, नितीन ताठे, नवनाथ बळीद, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. संदिप कुसळकर यांना या अगोदर सामाजिक संस्थेकडून अनेक पुरस्कार मिळाले असून सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. कोरोना काळातील सेवा असो गोरगरीब, दीन दलित, सर्वसामान्य नागरिकांच्या शासन दरबारी अडचणी सोडवण्याचे काम कुसळकर करतात.
Leave a reply













