मानोरी (राहुरी) / सोमनाथ वाघ : रविवारी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकले विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त शिस्तबद्ध दिंडी काढली. ज्ञानोबा माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले चिमुकले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच आकर्षक पेहराव केला होता. जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अशा जयघोषानी परिसर दुमदुमून गेला. विद्यालय ते मानोरी हनुमान मंदिर अशा मार्गाने दिंडी निघून शेवटी विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम, फुगडी, रिंगण, अभंग गायन, भक्तीगीतांवर नृत्य सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी बापूसाहेब वाघ, सोसायटी संचालक भास्कर भिंगारे, माजी चेअरमन विद्यमान संचालक नवनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव, कचरूभाऊ आढाव, भाऊसाहेब आढाव पिराखाँभाई पठाण, बाळासाहेब कोहकडे, अँड. संजय पवार, आनंद थोरात, सचिन साबळे, कारभारी थोरात, अशोक भिंगारे, उद्धव पिले, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय गुंजाळ, गणेश म्हसे, प्रकाश तांबे, अशोक काळे, बाबासाहेब विधाटे, मच्छिंद्र शिरसाठ, ऋषिकेश लांबे, गोपाळे भाऊसाहेब, सुभाष कोकाटे, देवरे मामा, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय पाखरे, शिक्षिका पूनम क्षीरसागर, विठाबाई शेटे, कलावती जासूद, ज्योती भोगे, शिक्षिका वाकचौरे मॅडम, बडे मॅडम, बर्डे मॅडम, तावरे मॅडम यासह पालक वर्ग शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Homeशिक्षण विषयीविठूरायाच्या नामघोषात निघाली अंबिका विद्यालय व जि.प. शाळेची दिंडी, ज्ञानेश्वर माऊली, तुकारामांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला
विठूरायाच्या नामघोषात निघाली अंबिका विद्यालय व जि.प. शाळेची दिंडी, ज्ञानेश्वर माऊली, तुकारामांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला

0Share
Leave a reply












