SR 24 NEWS

सामाजिक

विठूरायाच्या नामघोषात निघाली देवळाली प्रवरातील पठारे स्कूलची दिंडी

Spread the love

देवळाली प्रवरा : रविवारी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण भक्तिमय तयार झाले आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील आंबी स्टोअर येथील अस्मिता रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित ले. विठ्ठलराव पठारे इंग्लिश मिडीयम शाळेच्या चिमुकल्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त शिस्तबद्ध दिंडी काढली.

 ज्ञानोबा माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले चिमुकले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा आकर्षक पेहराव केला होता. जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अशा जयघोषानी परिसर दुमदुमून गेला. आंबी कॉर्नर ते आंबी हनुमान  मंदिर  अशा मार्गाने दिंडी निघून शेवटी श्री स्वामी समर्थ केंद्र  प्रांगणात विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.

त्यापूर्वी हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम, फुगडी, रिंगण, अभंग गायन, भक्तीगीतांवर नृत्य सादरीकरण करण्यात आले. हनुमान मंदिरामध्ये आरती पार पडली. प्रसंगी आंबी सोसायटीचे माजी चेअरमन सतीश जाधव ,नितीन कोळसे, विठ्ठल कोबरने ,सागर कोळसे,रमेश खर्डे,सोपान साळुंके ,गणेश कोळसे,किसन सालबंदे ,भास्करराव कोळसे ,नंदकिशोर जाधव , डॉ प्रमोद साळुंके आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले.

याकामी संस्थेचे अध्यक्ष भागवतराव पठारे, संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पठारे, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी पठारे, उपशिक्षिका श्रद्धा निद्रे,अंजली बेहळे, कविता पांडे ,दत्तात्रय पठारे, अकबर शेख,रोहिणी कोळसे ,सृष्टी पठारे , गायत्री पठारे , अर्चना साळुंके ,दर्शना बोरसे, अश्वीनी ढूस ,हर्षदा गिरमे , मोनाली पुजारी, भूषण कोळसे , संदिप चव्हाण , भास्कर भालसिंग, सुनिल हिंगे, बाळासाहेब गायकवाड ,पाराजी डव्हाण , हजारा शेख  आदींनी मेहनत घेतली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!