SR 24 NEWS

जनरल

अजामीनपात्र वॉरंटप्रकरणी आरोपीस राहुरी पोलिसांची अटक ; न्यायालयाकडून ₹10,000 दंड

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे (१६ जुलै ) : प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, राहुरी यांचेकडून जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंट (NBW) अंतर्गत राहुरी पोलिसांनी अमृत विश्वास उदावंत (रा. शिवाजी चौक, राहुरी) यास दिनांक १६ जुलै २०२५ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले. सदर वॉरंट SCC No. 1205/2023 अन्वये असून, आरोपी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेळेवर हजर न राहिल्यामुळे त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अटक करून आरोपीस न्यायालयात सादर करण्यात आले असता, मा. न्यायालयाने त्यास ₹10,000/- रुपयांचा दंड ठोठावला.

राहुरी पोलीस स्टेशनमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, न्यायालयातून समन्स मिळाल्यास त्यास गांभीर्याने घेऊन दिलेल्या तारखेस न्यायालयात हजर राहावे. अन्यथा कायदेशीर कारवाई अंतर्गत अटकेची कारवाई होऊ शकते, याची नोंद घ्यावी.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!