SR 24 NEWS

इतर

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ.अनिता मुद्दकन्ना तर व्हाईस पदी अनिल गुरव यांची निवड 

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. अनिता मुदकन्ना तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांचे अविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली. प्रथमच जवाहर महाविद्यालयास चेअरमन पदाचा मान देण्यात आल्याने सर्वत्र जवाहर परिवारात अभिनंदन केले जात आहे. पतसंस्था संचालक मंडळाचे बैठक आज दि. 3 ऑक्टोबर शुक्रवार रोजी मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत जवाहर विद्यालय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक जाधव साहेब हे होते.

जवाहर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. अनिता मुदकन्ना यांची चेअरमनपदी तर साने गुरुजी विद्यालय केशेगावचे अनिल गुरव तर रिक्त संचालकपदी प्रा. श्रीमती सुलक्षणा हराळकर यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. मुदकन्ना म्हणाल्या की, संस्था स्थापन झाल्यापासून प्रथमच महाविद्यालयास चेअरमन पदाचा मान मिळाल्याने आम्ही भारावून गेलो असून पतसंस्थेच्या हितासाठी अधिकाधिक योगदान देऊन, पदाचा सार्थकतेत उपयोग करून सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून पतसंस्थेस भरभराटी निर्माण करण्याची ग्वाही दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!