SR 24 NEWS

जनरल

मानोरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; शेतवस्तीवर भीतीचे वातावरण, वनविभागाने त्वरित पिंजरे लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

Spread the love

 मानोरी (राहुरी) १६ जुलै  / सोमनाथ वाघ : राहुरी तालुक्यातील मानोरी शिवारातील उसाच्या शेतामध्ये काल मंगळवारी (दि.15) रात्री 12 वाजेच्या सुमारास बिबट्या आढळुन आला. त्यामुळे मानोरी परिसरासह व शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.मानोरी व वळण शिवारात रस्त्यावरील असणारे चांदभाई पठाण यांच्या वस्ती वरील घरा शेजारी असणाऱ्या जनावराच्या शेडजवळ बिबट्या आढळून आला. यावेळी त्यांनी शेजारील नागरिकांना संपर्क करून जागे केले. यावेळी फटाके वाजविले असतांनाही बिबट्या पळाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागातही दोन महिन्यापूर्वी पोटे वस्ती, पठाणवस्ती, भिंगारे वस्ती, देवकाते वस्ती. गणपतवाडी परिसर अशा अनेक ठिकाणी येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर झेप घालून अनेक पाळीव कुत्रा जखमी केला तर अनेक महिन्यांपासून या परिसरामध्ये बिबट्याचे वारंवार कुठल्या ना कुठल्या शेतामध्ये शेतकऱ्यांना दर्शन होते. गेल्या सहा सात महिन्यापूर्वी मानोरी परिसरामध्ये हापसे या शेतकऱ्यावरही भर दिवसा बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर काल मंगळवारी रात्री 12 वाजल्याच्या दरम्यान चांदभाई पठाण यांच्या घराशेजारी असलल्या ऊसातून जनावराच्या शेडजवळ बिबट्या आल्याने शेळ्या ओरडायला लागल्याने ते घरातून बाहेर आले व शेड जवळ चालले असतात लाईटच्या उजेडात त्यांना बिबट्या दिसला ते बिबट्याला पाहून मागे वळाले

व पुन्हा घराकडे गेले व घरात असणाऱ्यांना जागे केले. मात्र यावेळी बिबट्याने शेड मधील असणाऱ्या शेळीला जखमी केले व तिथून धूम ठोकली पळून गेला. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ पुन्हा एकदा भयभीत झालल आहेत. बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत एकदा दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागाने याची दखल घेऊन तातडीने मानोरी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!