नायगाव प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : नायगाव तालुक्यातील मौजे देगाव येथे सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व गाजावाजात तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.सकाळी १० वाजता बौद्ध भिक्षू भन्ते संघपाल यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्य भिक्षूंच्या उपस्थितीत गावातील मुख्य रस्त्यावरून लेझीम पथकासह बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजा करून बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच उपस्थित सर्व भन्तेगणांनी धम्मदेसना दिली. या प्रसंगी बौद्ध वाड्यात आयोजित भोजनप्रसादाचा लाभ बौद्ध उपासक-उपासिकांसह उपस्थित भाविकांनी घेतला.या कार्यक्रमास संभाजी गायकवाड, राहुल गायकवाड, अशोक गायकवाड, रवी गायकवाड, माधव गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, पिंटू गायकवाड, अविनाश गायकवाड, अशोक शेरे, प्रभाकर गायकवाड, आनंदा गायकवाड, यशवंत गायकवाड, निर्वाण गायकवाड, मोतीराम गायकवाड, मारोती सांगडे, तसेच सर्व महिला मंडळ, रोडे परिवारातील सदस्य व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
Leave a reply













