राहुरी वेब प्रतिनिधी : शिक्षण व समाजसेवा क्षेत्रात पंधरा वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण कार्य करणारे तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज व बी.सी.ए.चे प्राचार्य जगदीश बाबासाहेब मुसमाडे यांना स्विफ्ट न लिफ्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुरी तालुक्यातील आरडगांव येथील तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज व वेदांता फाउंडेशन बी.सी.ए.चे प्राचार्य जगदीश मुसमाडे यांना नुकताच पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एक सामान्य शिक्षक ते संस्थाचालक असा खडतर प्रवास करत, विनाअनुदानित तत्त्वावर अध्यापन करत असताना समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने जगदीश मुसमाडे यांनी सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्या अंतर्गतच त्यांनी ज्युनिअर कॉलेज सुरू करून आरडगाव व परिसरातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज पूर्ण केली. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी उचललेली पावले आज अनेकांचे आयुष्य घडविणारी ठरली आहेत. छोट्या रोपट्याप्रमाणे सुरू झालेली ही वाटचाल आज एका भक्कम वटवृक्षात परिवर्तित झाली आहे.
पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य मुसमाडे म्हणाले, “मनापासून व चांगल्या उद्देशाने केलेल्या कामाला यश नक्कीच मिळते. सातत्य व प्रयत्न महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्नांची कास धरावी.” त्यांच्या यशात बंधू महेश मुसमाडे यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.या यशाबद्दल वेदांता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब मुसमाडे यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी बी. सी. ए कॉलेजचे प्राचार्य महेश मुसमाडे, तक्षज्ञ कॉलेजचे उपप्राचार्य सलीम पठाण , कॉर्डिनेटर प्रणिता बेंद्रे, हेड क्लार्क आकाश बोर्डे, प्रियाली मुसमाडे, ज्ञानेश्वरी मुसमाडे ,संतोष आनाप, सुरज तनपुरे ,गौरी सूर्यवंशी ,सोनाली शिरोळे ,कावेरी लांबे प्रांजली करपे, अमृता म्हसे, गौरी म्हसे, स्वप्निल तनपुरे, रामेश्वर ढोकणे, महेश अडसुरे, शुभम बोर्डे, अमोल पवार, योगेश बर्डे, कुणाल गुंजाळ यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व सहकाऱ्यांनी प्राचार्य जगदीश मुसमाडे यांचे अभिनंदन केले.
Leave a reply













