तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : गावपातळीवर कायदा आणि सुव्यवस्था व सामाजिक सलोखा राखुन पोलीसांना गुन्हेगारी तपासात मदत करीत पोलीसांमधील दुवा होऊन गावच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी पोलिस पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत जवाहर महाविद्यालय अणदूर येथील जेष्ठ विचारवंत डॉ मल्लीनाथ बिराजदार यांनी व्यक्त केले. संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पोलीस पाटील दिनानिमित्त पोलिस पाटील यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते
यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे समन्वयक बसवराज नरे,श्री श्री गुरुकुलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नरे, सेवानिवृत्त बॅंक शाखाधिकारी भानुदास सुरवसे, चंद्रकांत गुड्ड, शिवशंकर तिरगुळे, सचिन तोग्गी,संजिव आलुरे, नामदेव गायकवाड,अमोल हांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ बिराजदार म्हणाले की पोलिस पाटील तंटामुक्त गाव मोहिमेत सहभाग घेऊन गावातील तंटे गावातच मिटवून जनतेचा पैसा, वेळ, मानसिक ताण तणाव कमी करुन समाजोपयोगी कार्य करीत आहेत असे शेवटी म्हणाले
यावेळी जावेद शेख (अणदूर) बालाजी खरात (शहापूर) मनोज हांजगे (गुळहळ्ळी) बसवेश्वर सांगवे (खुदावाडी) रेखाताई हांडगे (फुलवाडी) विठ्ठल घोडके (धनगरवाडी) महेश पाटील (उमरगा), विनोद सलगरे (इटकळ), आनंद हिंगमीरे (सराटी) या पोलीस पाटलांचा संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार दयानंद काळुंके यांनी केले, सुत्रसंचलन डॉ संतोष पवार यांनी तर आभार संस्थेचे कोषाध्यक्ष प्रबोध कांबळे यांनी मानले. यासाठी मारुती बनसोडे,पुष्पक कसबे, अनुसया कांबळे,अनिता काळुंके, प्रणित कांबळे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता
गावच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी पोलिस पाटील यांचे कार्य कौतुकास्पद — डॉ मल्लीनाथ बिराजदार

0Share
Leave a reply












