SR 24 NEWS

इतर

राहुरी पोलिसांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून बॅरिकेट्सची मदत, अपघात टाळण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना

Spread the love

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यात नगर–मनमाड राज्य महामार्गाच्या कामामुळे वारंवार वाहतूक बदल, वन-वे व्यवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेता राहुरी पोलिसांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून बॅरिकेट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ॲक्सिस क्रेडिट ग्रामीण कंपनीच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली आहे.

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत नगर–मनमाड रोडचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक वन-वे करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी स्पष्ट दिशादर्शक फलक व योग्य बॅरिकेटिंग नसल्यामुळे वाहन चालकांना अडचणी येत असून अपघातांची शक्यता वाढत आहे. ही बाब गांभीर्याने लक्षात घेत माननीय पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घाडगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांनी ॲक्सिस क्रेडिट ग्रामीण बँकेचे CSR प्रमुख श्री. ज्ञानेश्वर कदम यांच्याशी संपर्क साधला.

या मागणीला कंपनीच्या व्यवस्थापनाने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आज दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी राहुरी पोलीस स्टेशनसाठी १५ व सोनई पोलीस स्टेशनसाठी १० असे एकूण २५ पोर्टेबल रिफ्लेक्टरयुक्त बॅरिकेट्स उपलब्ध करून दिले. या उपक्रमासाठी ॲक्सिस क्रेडिट ग्रामीणचे श्री. रवि रक्ताते, विलास पडघन, विकास पाटील, प्रमोद गवांदे, महेश गोरे व श्रीकांत पोपळघट यांनी विशेष मेहनत घेतली.

या प्रसंगी राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, नितीन सप्तर्षी, पोलीस हवालदार नवले, शेळके, नागरगोजे, गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार  अशोक शिंदे, लेखनिक आजिनाथ पाखरे व सचिन ताजणे यांनी ॲक्सिस क्रेडिट ग्रामीण बँकेच्या टीमचा सन्मान केला.
या बॅरिकेट्समुळे वाहतूक नियंत्रण अधिक सुलभ होऊन अपघात टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!