SR 24 NEWS

इतर

सात्रळमध्ये उधारीवर रिचार्ज नाकारल्याच्या रागातून मोबाईल दुकानदाराला बेदम मारहाण

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : ​राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे उधारीवर मोबाईल रिचार्ज मारण्याच्या कारणावरून एका तरुणाने मोबाईल दुकानदाराला बेदम मारहाण करत दुकानाची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी किरण सखाराम लोखंडे (वय ४२) यांचे सात्रळ येथे स्टेट बँकेसमोर मोबाईल विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे. १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० च्या सुमारास आरोपी सोनू फारुख तांबोळी हा दुकानात आला. त्याने लोखंडे यांना मोबाईलमध्ये १०० रुपयांचा रिचार्ज उधारीवर मारण्यास सांगितले. मात्र, “जुनी उधारी बाकी असताना नवीन रिचार्ज उधारीवर मारता येणार नाही,” असे लोखंडे यांनी स्पष्ट सांगितले. ​याचा राग आल्याने आरोपी सोनू तांबोळी याने लोखंडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता आरोपीने दुकानाच्या काउंटरची काच फोडून नुकसान केले आणि लोखंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
​या घटनेनंतर किरण लोखंडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी सोनू फारुख तांबोळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५१(२), ३५२ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक कोकाटे हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!