तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील भूमिपुत्र तथा सध्या कोपरगाव येथे दैनिक प्रभात (अहिल्यानगर आवृत्ती) मध्ये कार्यरत असलेले पत्रकार शंकर दुपारगुडे यांना ग्रामीण भागातील पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी अवॉर्ड्स २०२६’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांसह जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडत, सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य दुपारगुडे यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत Trans Asian Chamber of Commerce and Industry व Indo-Mongolian Chamber of Commerce and Industry या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थांच्या संयुक्त विद्यमाने त्यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता Royal Bombay Yacht Club, Gateway of India येथे करण्यात आले आहे. दोन्ही चेंबर्सचा अनुक्रमे २७ वा व ३२ वा वर्धापन दिनानिमित्त हा भव्य सोहळा पार पडणार असून, जगातील १४ पेक्षा अधिक देशांतील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देताना संस्थेचे सचिव व आयोजक डॉ. संजय भिडे यांनी सांगितले की, “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी अवॉर्ड्स २०२६” अंतर्गत संगीत, कला, सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, वैद्यकीय सेवा, मीडिया, लेखन, उद्योग, पत्रकारिता, शिक्षण, संस्कृती, लोककला आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३३ मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. ग्रामीण पत्रकारितेद्वारे जनमाणसांच्या समस्या प्रभावीपणे मांडून समाजप्रबोधन करणाऱ्या शंकर दुपारगुडे यांचा या यादीत समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
विविध देशांतील प्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे भारताचे जागतिक स्तरावरील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करणाऱ्या शंकर दुपारगुडे यांच्या या यशामुळे तुळजापूर तालुक्यासह अणदूर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे
शंकर दुपारगुडे यांना ‘द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी अवॉर्ड्स २०२६’ जाहीर, पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

0Share
Leave a reply












