प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ) :राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडत उपसरपंचपदी एकनाथ मिखायल आढाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष निवड बैठकीत ही निवड जाहीर होताच ग्रामपंचायत स्तरावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. ताराबाई भिमराज वाघ होत्या. ठरलेल्या वेळेनुसार मावळत्या उपसरपंच वैशालीताई खुळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी उपसरपंचपदासाठी एकनाथ मिखायल आढाव यांच्या नावाची सूचना ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव यांनी मांडली. कोणत्याही स्पर्धेविना एकमताने एकनाथ आढाव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड यांनी कामकाज पाहिले.
या निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव, नानासाहेब आढाव, कारभारी बर्डे, अलका भिंगारे, हिराबाई भिंगारे, सुमन आढाव तसेच ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड उपस्थित होते. निवडीनंतर मावळत्या उपसरपंच वैशालीताई खुळे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच एकनाथ आढाव यांचा सत्कार केला. यानंतर शुभेच्छा देण्यासाठी संभूगिरी महाराज गोसावी, माजी चेअरमन भिमराज वाघ, माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन उत्तमराव खुळे सर, युवा नेते बापूसाहेब वाघ, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आढाव, पिरखाभाई पठाण, कारभारी थोरात, कैलास आढाव, बाळासाहेब आढाव, मच्छिंद्र मकासरे, वसंत जाधव, मुकेश थोरात, ग्रामपंचायत क्लार्क सागर भिंगारे, योगेश आढाव, रोहिदास आढाव, सुखदेव जाधव आदींनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी माजी उपसरपंच वैशालीताई खुळे यांच्या कार्यकाळाबद्दल आभार व्यक्त करत नवनिर्वाचित उपसरपंच एकनाथ आढाव यांचे अभिनंदन केले. मानोरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवे नेतृत्व सकारात्मक व लोकाभिमुख भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Leave a reply












