श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : कडित बुद्रुक (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) येथील आदर्श दीपक कुलकर्णी या तरुणाची इंडियन आर्मीमध्ये निवड होऊन गावाला अभिमानाची पर्वणी मिळाली आहे. कडीत गावातील पहिलाच युवक म्हणून भारतीय सैन्यात भरती होण्याचा मान आदर्शने मिळवला आहे. तो स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सौ. स्वाती दीपक कुलकर्णी यांचा चिरंजीव असून साध्या कुटुंबातील हा मुलगा मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर स्वप्न साकार करण्यात यशस्वी झाला आहे.
आदर्शचे पहिले ते दहावीपर्यंतचे शिक्षण गुड शेफर्ड स्कूल, मांडवे येथे झाले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण कोल्हार येथे पूर्ण केले. सैनिकी व पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तो मागील दोन ते तीन वर्षांपासून संगमनेर तालुका (अहिल्यानगर) येथील सह्याद्री अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होता.त्याच्या अथक परिश्रमांना यश आले असून त्याची इंडियन आर्मीमध्ये स्वीकृती झाली आहे. एका गरीब कुटुंबातून आलेल्या आदर्शने सैन्यात प्रवेश मिळवून कडीत गावासह पंचक्रोशीचा गौरव वाढवला आहे. गावात आणि परिसरात त्याचे मोठ्या उत्साहात अभिनंदन होत आहे.
कडीत गावाचा अभिमान! ग्रामपंचायत सदस्यांचा मुलगा आदर्श कुलकर्णी भारतीय सैन्यात दाखल; गावातील पहिला आर्मी जवान म्हणून सर्वत्र अभिनंदन

0Share
Leave a reply












