SR 24 NEWS

इतर

राहुरी पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अमलदारांमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी पोलिस स्टेशनच्या सतर्क व कर्तव्यदक्ष पोलिस अमलदारांनी आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाचे प्राण वाचवून संवेदनशीलता आणि तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.आज दि. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास विराज ढसाळ, रा. तांदुळवाडी यांनी 112 हेल्पलाईन तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून माहिती दिली की महिंद्र देविदास कोळशे (रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर) हा युवक राहुरी रेल्वे स्टेशन येथे मोटारसायकल लावून आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे.

माहिती मिळताच पोलिस अमलदार सचिन ताजणे व प्रमोद ढाकणे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्टेशन परिसरात शोध घेऊन सदर युवकाला रेल्वे रुळावर आडवा झोपलेला अवस्थेत आढळून तात्काळ त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले व आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त केले.

या शौर्यपूर्ण व मानवतावादी कार्याबद्दल राहुरी पोलिसांचे नागरिकांकडून व त्या युवकाच्या नातेवाईकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनीही या कामगिरीबद्दल राहुरी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!