तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : लोककलावंत तथा पत्रकार दयानंद काळुंके यांचा प्रवास जीवघेणा व खडतर तर होताच, पदरात काहीच नसताना त्यावर ही मात करून दोन अपत्यांना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न समाजाला प्रेरणा देणार असल्याची भावना ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत अणदूर कर यांनी व्यक्त केले. ते जय मल्हार पत्रकार संघाचे सदस्य व धाराशिव बालकल्याण विकास समितीचे सदस्य दयानंद काळुंके यांच्या जन्मदिनानिमित्त संघ व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते अविनाश मोकाशे, मु. आ. गोपाळ कुलकर्णी, डॉ. अमर कंदले, उद्योजक गुणवंत मुळे, करबसप्पा धमूरे, उपस्थित होते.
संघाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवून जिल्ह्यात वेगळा आदर्श निश्चितच दिशा देणारा असल्याचे सांगून दयानंदच्या खडतर प्रवासातून यशस्वी वाटचालीचा चाललेला प्रवास संघाला सार्थ भूषणावह असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अडचणी-समस्याशिवाय जीवनात खऱ्या अर्थाने मार्ग निघत नाही. त्यामुळेच मला कुटुंबाची, समाजा साठी केवळ ध्येय ठेवून काम केल्याने च यशाला गवसनी घालता आल्याचे सांगून त्यात कळत – नकळत अनेकांचा सिंहाचा वाटा असल्याचे काळुंके यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी संघाचे चंद्रकांत गुड्ड्, संजू आलूरे, शिवशंकर तिरगुले, सचिन तोग्गी, खंडू मुळे, दीपक मोकाशे, संजू मोकाशे, राम भंडारकवठे सह बहुसंख्य मित्रपरिवार उपस्थित होता.
Leave a reply













