तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या अणदूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गण निवडणुकीचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे. या निवडणुकीत महायुतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार दीपक दादा आलूरे आणि पंचायत समितीचे उमेदवार रणवीर चव्हाण यांच्या विजयासाठी नळदुर्ग नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी ठीक ७ वाजता मुख्य रस्त्यावरून भव्य पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेदरम्यान नगराध्यक्ष धरणे यांनी मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेत, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. देश व राज्यात महायुतीची सत्ता असून गावपातळीवर सर्वांगीण विकासासाठी महायुतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीची सत्ता अटळ असल्याचा विश्वास व्यक्त करत, गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी तसेच अधिकाधिक निधी विकासकामांसाठी खेचून आणण्यासाठी दीपक आलूरे व रणवीर चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सुनील चव्हाण, करवसप्पा धमूरे, धनराज मुळे, डॉ. विवेक बिराजदार, बाबुराव मुळे, सुधीरसिंग ठाकूर, आप्पासाहेब शेटे, अक्षय करपे, मायाप्पा गळा काटे, गुणवंत मुळे, डॉ. हरिदास मुंडे, विशाल घुगे, अजित गाढवे, प्रवीण घोडके, काशिनाथ घुगे, रमाकांत माने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ , नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा..!

0Share
Leave a reply












